Thursday, August 6, 2009

ताब्यात ठेवा रक्तदाब


आहार हा आपल्या आदर्श वजनाच्या अनुषंगाने असावा. कमी खाणं, जास्त वेळा खाणं, शक्यतो पुर्ण शाकाहार आणि स्निग्ध पदार्थ टाळणं हे नियम तर माहितीचेच आहेत. ५ ग्रॅम मीठ म्हणजे छोट्या चमच्यामधे सपाट भरेल एवढच मीठ दिवसभरात खालं जावं. वरून घेतलेलं मीठ, लोणची, पापड, चटण्या, खारे पदार्थ सरासरीने वर्ज्य असावेत. कच्चे पदार्थ, मोड आलेली कडधान्य आहारामध्ये भरपुर असावीत.
आठवड्यातून ३ ते ४ तास एरोबिक पद्धतीचा व्यायाम हायपरटेन्शनच्या दॄष्टीने महत्त्वाचा असतो. जलद चालणं, धावणं, पोहणं, सायकलिंग किंवा हेल्थक्लब मधले एरोबिक्स हे सर्व एरोबिक व्यायामप्रकार आहेत. आठवड्यातून कमीत कमी ३ दिवस केलेल्या योगासनांमुळे शारीरिक आणि मानसिकदॄष्टयासुद्धा अनुकूल परीणाम हायपरटेन्शनवर दिसतात.
संपूर्ण व्यसनमुक्ती हा हायपर्तेन्शनच्या ट्रीटमेंटमध्ये अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तबाखू कुठल्याही स्वरूपात घेतली तरी त्यमुळे ब्लड प्रेशर हे वाढतच असतं आणि हायपरटेन्शनमुळे होणारा अ‍ॅथेरोस्क्लेरॉसिस नावाचा आजार की ज्यामुळे हॄदयविकाराचा झटका येतो किंवा पॅरालिसिस होतो हे कॉम्प्लिकेशन्सुद्ध आपण व्यसनमुक्तीमुळे टाळू शकतो.
प्रचंड धकधकीच्या जीवनामुळे अलीकडे तरुणांमध्येसुद्धा सर्रास हायपरटेन्शनचं प्रमाण वाढत चाललं आहे. तणावमुक्तीची उत्तरं हा एक फारच व्ययक्तिक प्रश्न असतो. रागाचा पारा खाली ठेवणं, व्यक्तिगत सबंध जाणीवपूर्वक सांभाळणं, स्वतःसाठी वेळ काढणं, छंद जोपासणं, आर्थिक व्यवहाराबद्दल स्वच्छ संकल्पना असणं, अतिमहत्वाकांक्षीपणाला थोडासा अंकुश ही ढोबळ तत्त्वं आहेत. हे सर्व साध्य होण्यासाठी योगासनं, ध्यानधारणा, आध्यात्मिक दॄष्टिकोन इत्यदी साधनांचा वापर व्हावा. तणाव हा परीस्थीतीत नसून मनःस्थितीत असतो. त्यामुळे आपल्या मनःस्थितीत बदल घडवण्याकडे लक्ष द्यावे. आध्यात्मिकतेची जोड तरुणपणीच लागल्यास अरेला कारे कमी होऊ शकतात. अशाप्रकारे उत्तम जीवनशैलीतल्या बदलाने आपण सिस्टऑलिक ब्लड प्रेशरचे २० आणि डायस्टॉलिकचे १० अंक सहज कमी करु शकतो.यामुळे बर्‍याच जणांची औषधं कमी होतात आणि क्वचित ती बंदसुध्दा होउ शकतात.
- डॉ. जगदीश हिरेमठ (हॄदयरोगतज्ज्ञ, पुणे)

No comments:

Post a Comment