Saturday, October 20, 2012

उपचार जुनाट सर्दीवर

          सायनुसायटिस हा सर्दीचाच एक प्रकार! चेहऱ्याच्या काही हाडांमधील पोकळ्या हवेने भरलेल्या असून, त्यांना सायनसेस (sinuses) असे म्हटले जाते. असे सायनसेस नाकाच्या प्रत्येक बाजूला चार असे असतात. नाकातील पटल हे सायनसच्या पोकळीत जाऊन पसरलेले असते.त्यामुळे नाकातील कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन, उदा. विषाणूंमुळे होणारी सर्दी (viral rihinitis) पसरत जाऊन आजूबाजूच्या सायनस पाटलाला देखील सूज येते. यालाच सायनुसायटिस असे म्हणतात.
          यात सर्दीचा स्त्राव सुरुवातीला पांढरट पाण्यासारखा असतो; परंतु जसजशी सर्दी वाढत जाते, तसा तो स्त्राव पिवळट, हिरवट बनत जातो., अशा प्रकारच्या सर्दीबरोबर डोके दुखणे , ताप किंवा बारीक कसर आल्यासारखे वाटणे, चेहरा, कपाळ नाकाचे हाड दुखणे, घशात मागच्या बाजूला चिवट स्त्राव होत रहाणे इत्यादी लक्षणे सायनुसायटिसमध्ये दिसून येतात.
           सततची सर्दी, दातांचे विकार, इन्फेक्शन यामुळे सायनुसायटिस होण्याची प्रवृत्ती वाढते. तसेच नाकाचे हाड वाढणे, नाकातील पॉलीप्स (वाढलेले माणसा) साचलेली घट्ट सर्दी या सर्व गोष्टी सायनुसायटिसची तीव्रता व गंभीरता वाढवायला कारणीभूत असतात.
            काही रुग्णांमध्ये प्रत्येक ऋतूत होणाऱ्या सर्दीमुळे नाकाच्या पाटलाला सूज येऊन ते जाड बनते. ही सूज घशात व नाकाशी निगडीत अशा युस्टेशिअन (Eustacian) नलिकेपर्यंत पसरत जाते. सूज आलेल्या या पाटलाची प्रतिकारक्षमता अत्यंत कमी असल्यामुळे रुग्णाची सतत सर्दी होण्याची प्रवृत्ती वाढते. हळूहळू नाक गच्च असल्यामुळे नाकाने श्वास घेणे बंद होऊन तोंडाने श्वास घेतला जाऊ लागतो. वास येण्याची व ऐकू येण्याची क्षमताही कमी होत जाते. सर्दी कायमची ठाण मांडून बसलेले हे रुग्ण इतर रोगांनाही सहजरीत्या आमंत्रित करतात.
           होमिओपॅथिक औषधे, नाकातून गळणारा स्त्राव बंद करतात. आतिल साचलेल्या स्त्रावाचा निचरा करतात, नाकाच्या व सायनसेसच्या श्लेष्माला पटलाची सूज व सूज येण्याची प्रवृत्ती कमी करतात. एवढेच नव्हे, तर नाकाच्या पाटलाला संरक्षणात्मक कवच देतात व रोग्यांची जंतूंचा संसर्ग होण्यापासून प्रतिकारक्षमता वाढवतात. होमिओपॅथितील हायड्रॅस्टीस, काली बायक्रोम, पल्सेटिला, मर्कसॉल, सिलीशीआ, थुना, हिपार सल्फ, काली आयोड  हि औषधे अत्यंत जुनाट सर्दीवर हि अश्चर्यकारकरीत्या मात करू शकतात. मात्र, सर्दीच्या प्रवृत्तीचे मूळ थोडे खोलवर रुजलेले असल्यामुळे त्या रुग्णाच्या प्रवृत्तीला सर्व बाजूंनी पुरक अशी होमिओपॅथिक  प्रकृतिजन्य (constitutional) औषधे तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावी लागतात.
            प्रत्येक पॅथीत शरीर निरोगी राखण्याची जशी शक्ती आहे, तशाच मर्यादाही! या शक्ती व मर्यादांचा खोलवर विचार करून त्या त्या वैद्यक शास्त्राचा उपयोग करून घेणे, हे मानवजातीसाठी हितावह ठरेल यात शंकाच नाही.
                                                                                                                       - डॉ. अपर्णा पित्रे

3 comments:

  1. I want to meet you
    For sinusitis
    Plat send your address

    ReplyDelete
  2. My self Deepak joshi
    9823189094

    ReplyDelete
  3. My no 9823189094
    I want to meet you
    For treatment
    Please send your address or mo no

    ReplyDelete