Wednesday, August 19, 2009

हॄदयविकाराचा झटका (Heart Attack)

हॄदय हे अविरतपणे संपूर्ण शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा करत असते हे सर्वविदितच आहे. प्रत्येक अवयवाचे कार्य, प्रत्येक स्नायूचे कार्य, प्रत्येक हालचाल हॄदयातून आलेल्या शुद्ध रक्तातून मिळलेल्या शक्तीतून होत असते. साहजिकच संपुर्ण शरीराला रक्त पुर्विणार्‍या हॄदयालाही काम करण्यासाठी रक्ताची आवश्यकता असते. हॄदयाला रक्त पुरविणार्‍या रक्तवाहिन्याही (करोनरी आर्टरीज्) असतात. या रक्तवाहिन्या काही कारणामुळे जाड झाल्याने किंवा त्यांच्यामधे अडथळा निर्माण झाल्याने हॄदयाला होणारा रक्तपुर्वठा कमी झाला किंवा थांबला की हॄदयाच्या त्या विशिष्ट भागाला रक्त व रक्तातून मिळणारी शक्ती मिळत नाही व हॄदयाचा तो भाग निकामी होतो. याचा परिणाम म्हणुन हॄदयाच्या ठिकाणी तीव्र वेदना होतात, कैक वेळेला या वेदना डाव्या हाताकडे पसरतात, छातीत जड वाटते, घाम येतो, दम लागतो, अस्वस्थता जाणवते. अशी लक्षणे घेऊन व्यक्ती दवाखान्यात गेली की डॉक्टर 'हार्ट अ‍ॅटॅक' असे निदान करतात.

झटक्याची तीव्रता जेवढी जास्ती तेवढा प्राणाला धोका अधिक असतो, त्यामुळे या प्रकारची लक्षणे दिसू लागताच ताबडतोब तज्ञांचा सल्ला घ्यावा. प्रत्येक क्षण मोलाचा आहे हे ओळखून त्वरित आवश्यक ती पावले उचलावीत.

वर आपण हार्ट अ‍ॅटॅकची सामान्य लक्षणे पाहिली. ही लक्षणे अनेकदा कमी अधिक होऊ शकतात. काही लोकांना छातीत दुखत नाही, तर फक्त घाम येतो, चक्कर येते. तरीहि तपासल्यानंतर 'हार्ट अ‍ॅटॅक' येऊन गेल्याचे निश्चित होते. तर क्वचित असेही दिसते की पुर्वी हार्ट अ‍ॅटॅक आला होता, असे डॉक्टरच रोग्याला सांगतात, रोग्याला मत्र त्याप्रकारचा काहीही त्रास जाणवलेला नसतो.

हार्ट अ‍ॅटॅक आला असता उदभविणारी आत्ययिक अवस्था (इमर्जन्सी) यशस्वीरीत्या सांभाळण्यासाठी आवश्यकता असल्यास आधुनिक विज्ञानाने सांगितलेले 'कार्डियाक मसाज' किंवा ताबडतोब ऑक्सिजन देणे वगैरे उपचार करावयासही हरकत नाही. मात्र एकदा इमर्जन्सी आटोक्यात आली की हॄदयरोग व्हायचे मूळा कारण शोधावे. 'निदानं परिवर्जनम्' या तत्त्वाला अनुसरून ती कारणे कटाक्षाने टाळावीत व हॄदयरोगाची संप्राप्ती जाणून घेऊन त्याला अनुसरून हॄदयरोग बरा होण्यासाठी योग्य उपचार सुरू करावेत.

हॄदयाचा झटका आल्यावर
  • प्रथम काही दिवस म्हणजे साधारणतः दोन आठवडे विश्रांती घ्यावी, त्यानंतर जमेल, सोसवेल तेवढे थोडे थोडे हिंडणे, फिरणे सुरू करावे. मात्र हॄदयावर ताणयेईल अशा गोष्टी निश्चित टाळाव्यात.
  • आहार पचावयास हलका, ताजा व सात्त्विक असावा. तेलकाट मसालेदार तसेच चवळी, पावटा, आदी वातवर्धक रुक्ष पदार्थ खाणे टाळावे.
  • अंडे खाऊ नये. इतर मांसाहारही शक्यतॉ करू नये किंवा अगदीच मासाहार करायचा असल्यास केवळ मांसरस म्हणजे सूप घ्यावे.
  • कच्चे मीठ खाऊ नये म्हणजे वरून मीठ घ्यायची सवय नसावी. तसेच खारट अन्नपदार्थ खाणे टाळावे.
  • पोटाला तडस लागेपर्यंत जेवू नये. रात्री उशिरा व जडजेवण करू नये.
  • जेवणानंतर, विशेषतः दुपारच्या जेवणानंतर विश्रांती घ्यावी. विश्रांती याचा अर्थ झोप नव्हे, तर जेवणानंतर आरामखुर्चीत बसावे, किंवा झोप येणार नाही अशा बेताने वामकुक्षी करावी. जेवणानंतर लगेच फिरायला जाणे, प्रवास करणे किंवा जोरजोराने बोलणे इत्यादी थकायला लावणार्‍या गोष्टी पूर्ण टाळाव्यात.
  • आहार व आचरणामध्ये नियमितता आणाअवी, रात्री पुरेसे तास व योग्य वेळी झोपून योग्य वेळी उठावे.
  • सुरूवातीला घरातल्या घरात किंवा गच्चीत वगैरे चालावे. हळूहळू चालण्याची क्षमता वाढली की मग बागेत, समुद्रावर वगैरे ठिकाणी कमीत कमी ३०-४० मिनिटे नियमित चालण्याची सवय ठेवावी.
  • हॄदय हे मनाचे स्थान असल्याने मन प्रसन्न, शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. धसका बसेल, भीती वाटेल असे प्रसंग टाळावेत. विशेषतः अशा प्रकारचे वाचन, टीव्हीवरील मालिका वगैरे मुळीच पाहू नयेत.
  • मनाबरोबर हॄदय ओजाचेही स्थान असल्याने ओजाला शक्ति मिळेल अशी आहारद्रव्ये सेवन करावीत. उदा. दूध, घरी बनवलेले साजूक तूप, घरी बनवलेले ताजे लोणी-खडीसाखर, रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम, अशा पौष्टिक गोष्टींचा आहारात सामावेश असू द्यावा. कोलेस्टेरॉल वाढेल व वजन वाढेल, पुन्हा हार्ट अ‍ॅटॅक येईलया भीतीने या ओजवर्धक, हॄदयाला पोषक गोष्टींपासून हॄदयाला व स्वत:ला वंचित ठेवू नये. वर उल्लेखिलेले लोणी व तूप हे योग्य पद्धतीने बनवलेले असल्यास व ते योग्य स्वरूपात व योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याने अपाय तर दूरच पण अप्रतिम आश्चर्यकारक फायदाच होतो हा आजवर असंख्य रुग्णांचा अनुभव आहे.
  • धूम्रपान पूर्ण बंद करावे, तंबाखू खाऊ नये.
एकदा हॄदयविकाराचा झटका येऊन गेला की हॄदयाच विशिष्ट थोडासा भाग निकामी होतो. त्यामुळे उर्वरित आयुष्यभर त्या व्यक्तीला स्वतःच्या हॄदयाची काळजी घेणे भाग असते. तसेच पुन्हा हार्ट अ‍ॅटॅक येऊ न देणे ही सुद्धा अत्यंत आवश्यक गोष्ट होय. कारण प्रत्येक अ‍ॅटॅकमध्ये हॄदयाचा अधिकाधिक भाग निकामी होत जातो व हॄदयाची ताकद कमी कमी होत जाते व एकंदरीतच प्राण धोक्यात येण्याचे प्रमाण वाढत जाते. हार्ट अ‍ॅटॅक आल्यानंतर हॄदयाला रक्तपुरवठा करणार्‍या वाहिन्यांतीलकडकपणा किंवा त्यांच्यातील अडथळा दूर करण्यासाठीही योग्य उपचार करावे लागतात. आजकाल शस्त्रक्रीयेद्वारे ''अँजिओप्लास्टी' किंवा 'बायपास'ने ब्लॉकेजेस दूर करता येऊ शकतात. मात्र, हे ब्लॉकेजेस बन्वण्याची शरीराची सवय न मोडल्यास बहुतेक वेळेला पुन्हा पुन्हा ब्लॉकेजेस होताना दिसतात.
योग्य पद्धतीने केलेले आयुर्वेदिक पंचकर्म, हद्बस्ती, बस्ती इत्यदि उपचार, आहार-विहारात आवश्यक ते बदल व वैद्यांच्या सल्ल्याने प्रकॄतीनुरूप घेतलेली आयुर्वेदिक औषधे यांच्या सहाय्याने हार्ट अ‍ॅटॅक व हॄदयरोगावर पूर्णपणे विजय मिळवलेले असंख्य रुग्ण आज निरोगी आयुष्य जगत आहेत.
सध्या पंचकर्म हा शब्द रूढ झालेला दिसतो. बर्‍याच वेळा नुसते तेल लावणे, शेक करणे,बाष्प स्नान, शिरोधारा, पिडिंचिल वगैरे गोष्टीच पंचकर्माच्या नावाखाली केल्या जातात. फक्त मीठाचे पाणी पाजून उलटी करव णे म्हणजे वमन, तर रात्री एखादे जुलाबाचे औषध देणे म्हणजे विरेचन असे या पंचकर्माचे स्वरुप असते. परंतु हॄदयरोगाच्या रोग्यांच्या बाबतीत असे पंचकर्म कामाचे नाही. पंचकर्मातील घॄतपान म्हणजे औषधींनी स्निग्ध घॄत प्यावयास देणे ही एक महत्त्वाची क्रिया करावी लागते. प्रकॄती, हॄदयरोगाचा प्रकार, रुग्णाची शक्ती वगैरे गोष्टींचा नीट अभ्यास करुन घॄताची मात्रा, घॄतपानाचे दिवस वगैरे गोष्टी ठरवाव्या लागतात.
याप्रकारे योग्य प्रकारे घॄतपान करून विधिपूर्वक पंचकर्म केले तरच शरीरातील बहुतांशी आमद्रव्ये, विषद्रव्ये शरीराबाहेर निघू शकतात, ज्यायोगे रक्तवाहिन्यातील अडथळा दूर होण्याची क्रिया सुरू होऊ शकते, हॄदयाच्या वाहिन्या व स्नायूंना आलेले काठिण्य हळूहळू कमी होऊ लागते. तेव्हा हॄदयरोगात असे पूर्वकर्मोत्तर विधिपूर्वक केलेले पंचकर्मच उपयोगी पडते हे लक्षात असू द्यावे अन्यथा पंचकर्म केले असे मानसिक समाधान हॄदयरोग्यांच्या बाबतीत चालणार नाही.
हे उपचार शस्त्रक्रियेपूर्वी केले तर उत्तमच पण शस्त्रक्रीया होऊन गेल्यानंतरही पुनश्च ब्लॉक्स होऊ नयेत म्हणूनही यांचा उत्तम उपयोग होताना दिसतो. अ‍ॅटॅकच्या वेळेला खराब झालेले स्नायू कही अंशी पूर्ववत होऊ शकतात तसेच पुन्हा अ‍ॅटॅक येऊ नये एवढी शक्ती नक्कीच मिळू शकते.
हार्टअ‍ॅटॅक येऊच नेये म्हणून घ्यावयाची काळजी
  • वयाच्या ४० वर्षानंतर खाण्या-पिण्याच्या सवयी हळूहळू बदलाव्यात. आयुष्यात नियमितता आणण्याचा प्रयत्न करावा.
  • रोज योगासनांचा अभ्यास करावा. कमीत कमी १२ सूर्यनमस्कार रोज घालावेत. ३५ ते ४० मिनिटे चालायला जावे.
  • स्वतःला सोसवेल एवढेच शारीरिक श्रम करावेत. रात्र-रात्र जागरणे करू नयेत.
  • स्वतःला सहज पेलवेल एतकीच जबाबदारी अंगावर घ्यावी. पैशासाठी किंवा प्रतिष्ठेपायी काम वाढवून ठेवू नये.
  • कामामुळे कितीही व्यस्तता असली तरी रोज थोडावेळ स्वतःसाठी काढण्याची सवय ठेवावी. या वेळेत मन रमेल अशा काही गोष्टी कराव्यात. काही छंद असल्यास त्यात मन रमवावे. डोळे मिटून शांत बसावे, योगनिद्रा किंवा 'स्पिरीट ओफ हार्मनी' सारखे मनःशान्ती देणारे स्वास्थ्यसंगीत ऐकावे.
  • अकारण काळजी करणे बंद करावे. मनावरचा ताण कोणत्या ना कोणत्या मार्गाने कमी करण्यासाठी प्रयत्नरत असावे.
  • वजन फार वाढू देऊ नये. अर्थातच वेळीच योग्य उपचार करून वजन आटोक्यात ठेवावे.
  • मलावष्टंभ होणार नाही यासाठी काळजी घ्यावी. गरज पडल्यास योग्य औषधे सुरू करावीत. अधूनमधून मॄदू विरेचन घ्यावे.
  • तंबाखू, धुम्रपान, अफू, भांग आदी मादक द्रव्यांचे सेवन करू नये.
  • मधुमेह, रक्तदाब वगैरे व्याधी असल्यास फक्त रोगाची लक्षणे दबवणारी नव्हे, तर रोग मुळापासून बरा करू शकणारी औषधे घ्यावीत. गोळ्या इंजेक्शन्स घेऊन त्रास होत नाही म्हणजे काळजी करण्याचे (त्त्याहीपेक्षा काळजी घेण्याचे) कारण नाही अशा भ्रमात राहू नये.
  • घरात कुणाला म्हणजे आई-वडील, भाऊ-बहीण यापैकी कुणाला हार्ट अ‍ॅटॅक येऊन गेला असल्यास खालील लक्षणांवर लक्ष ठेवावे.
  1. अकारण छातीत धडधडणे
  2. चालले किंवा जिने चढले की दम लागणे.
  3. जेवणानंतर छातीत जड झाल्यासारखे वाटणे.
  4. रात्री अचानक छाती आवळली गेल्यासारखे वाटणे
  5. अचानक छातीत काही काळासाठी दुखणे व नंतर आपोआप बरे वटणे.
अशी लक्षणे दिसत असल्यास तज्ज्ञ वैद्यांकडे जाऊन रक्ताभिसरण व हॄदयाची स्थिती योग्य आहे ना याची तपासणी करून घ्यावी. नाडीपरीक्षणावरुन आणि इतर आयुर्वेदिक अष्टविध परीक्षा पद्धतींच्या सहाय्याने अनुभवी वैद्यहे सांगू शकतात. साधारणतः काही दिवसांनंतर जो त्रास उत्पन्न होऊ शकतोत्याचे निदान अशा आयुर्वेदिक निदान पद्धतीने अगोदरच करता येऊ शकते. 'स्ट्रेस टेस्ट' करून घेतल्यासही रक्ताभिसरण, हॄदयाची स्थिती यांचा अंदाज येऊ शकतो. वेळीच परीक्षणे करून योग्य ते उपचार सुरू करावेत.
डॉ. श्री. बालाजी तांबे

Monday, August 17, 2009

पांढरे डाग

पांढरे डाग बरे होऊ शकतात का? ते लवकर बरे होण्यासाठी उपाय सांगा.
पांढरे डाग येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. आनुवंशिक डाग बरे होण्यास बहुधा कठीण असतात. विरुद्ध आहारामुळे किंवा इतर रक्तशुद्धीकर आहारविहाराने आलेले डाग मात्र आयुर्वेदिक औषधांनी बरे होऊ शकतात. पोटातून रक्तशुद्धीकर मंजिष्ठा चूर्ण, मंजिष्ठादि काढा घ्यावा. पांढर्‍या डागांवर बाहेरून लावण्यासाठी बावचीचे तेल उपयोगी पडते, मात्र हा प्रयोग आयुर्वेदिक तज्ञाच्या सल्ल्यानेच करावा.

- डॉ. श्री बालाजी तांबे

टिपणी :
माझ्या सासरी आणि माहेरी दोघीकडे पांढर्‍या डागांचा इतिहास आहे. म्हणून मी असेच इंटर्नेटवर शोध करत असतान काही महिती सापडली.
एक चायनीज हर्ब आहे "गिंग्को बिलोबा". ते हे पांढरे डाग कमी करायला मदत करते. त्याबद्दल माहिती तुम्हाला खाली दिलेल्या दुव्यांवर सापडेल.

याच्या रसाच्या गोळ्या सहजा सहजी उप्लब्द असतात. मी माझ्या नतेवायकांसाठी अ‍ॅमेझॉन वरून मागवल्या होत्या.
ह्या गोळ्या घ्यायच्या आधी आयुर्वेदिक तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. मी डॉक्टर नाहि.

स्मरणशक्ती व एकाग्रता वाढवण्यासाठी

माझा मोठा मुलगा १८ वर्षाचा आहे. त्याची स्मरणशक्ती व एकाग्रता वाढावी यासाठी काही घरगुती उपाय सुचवा.

रात्री ३-४ बदाम पाण्यात भिजवून सकाळी सोलून रोज खायला द्यावेत. रोज सकाळी पंचामॄत (२ चमचे तूप, १ चमचा मध, १ चमचा ताजे दही, १ चमचा साखर, ४-५ चमचे दूध यांचे मिश्रण) द्यावे. घरी बनवलेले लोणी व साखर खाण्यास द्यावी. तसेच रोजच्या आहारात घरी बनवलेल्या साजूक तुपाचा सामावेश असावा.
सूर्यनमस्कार घालायला शिकवावे. रोज रामरक्षा, भगवदगीता, पाढे वगैरे म्हणण्याचा सराव ठेवावा.

- डॉ. श्री बालाजी तांबे

Friday, August 14, 2009

' गती - विकॄती '

रक्त जरी सर्व शरीराला व्यापून असले व रात्रंदिवस गतिशील असले तरी ते रक्तवाहिन्यांमध्ये बंदिस्त असते. मेंदू, हॄदय, मूत्रपिंड वगैरे मोठे अवयव असोत किंवा करंगळीचे टोक असो, सर्व दूर रक्तवाहिन्यांमधून रक्त फिरत असते. यालाच रक्ताभिसरण क्रिया म्हणतात व त्यातूनच रक्तदाब तयार होत असतो. अर्थातच रक्तदाब प्रत्येक व्यक्तीला असतोच कारण त्याखेरीज रक्ताभिसरण होऊच शकणार नाही.

निरोगी अवस्थेतही रक्तदाब प्रसंगानुरुप थोडा फार कमी जस्ती होत असतॉ. भरभर चालण्याने, पळण्याने जशी श्वासाची गती वाढते तेसेच श्रम झाल्यास रक्तदाब थोडा वाढतो पण विश्रांती घेतल्यावर आपण प्राकॄतावस्थेत येतॉ.

आयुर्वेदात रक्तदाब या नावाने वेगळा असा व्याधी सांगितलेला आढळत नाही. मात्र शरीरातील रस, रक्त धातूंच्या गतीतील विकॄतीमुळे होऊ शकणार्‍या संभाव्य विकारांपैकी ह एक विकार होय. ही 'गती - विकॄती' रक्ताभिसरणास कारणीभूत असणार्‍या हॄदय किंवा रक्तवहिन्यातील बिघाडामुळे होउ शकते, शरीरातील अतिरीक्त क्लेदांश मूत्रामार्फत वाहून नेणार्‍या किडनीचे काम व्यवस्थित होत नसल्याने उदभवू शकते किंवा 'चिन्त्यानां चाति चिन्तनात्' या न्यायानुसार अति मानसिक ताणामुळे अर्थातच मेंदूच्या अति श्रमानेही होऊ शकते.

तसेच रक्तदाब वाढला असता किंवा कमी झाला असताही शरीर, मनावर दिसणारी लक्ष्णे वात, पित्त दोष वाढल्याची व कफ दोष कमी झाल्याची असतात. म्हणून आयुर्वेदानुसार रक्तदाबावर उपचार करताना त्रिदोष संतुलनाबरोबरच, रक्तदाबाचा त्रास होण्याचे मूळ कारण काय आहे याचा विचार केला जातो व त्यानुसार केलेल्या उपचारांनी रक्तदाबावर यशस्वी चिकित्सा करता येऊ शकते.

रक्तदाबाची सामान्य कारणे अशी सांगता येतील -
  • पचायला जड अशा मेदस्वी पदार्थांचे अती सेवन उदा. तेल, चीज, मांसाहार
  • खाण्यापिण्यातील व वागण्यातील अनियमितता, एकंदर जीवनशैलीतील अनिर्बंधता व बेशिस्तपणा
  • व्यायामाचा अभाव
  • अतिस्थूलता
  • अतिरिक्त धूम्रपान व मद्यपान
  • अतिचिंता तसेच कामामध्ये अति व्यस्तता

याखेरीज किडनीचे कर्य नीट न होणे, अनेक वर्षांचा मधूमेह, रक्तवाहिन्या कठीण व जाड होणे, स्त्रियांच्या बाबतीत गर्भारपणात रक्तदाब वाढल्याचा इतिहाअस असणे तसेच गर्भाशय काढून टाकणे ईत्यादींमुळे रक्तदाब वाढु शकतॉ.

मुळात रक्तदाबाचा विकार मागे लागूच नये म्हणून खबरदारी घ्यायला हवी. हा विकार ओळखणे खरे पहाता अतिशय सोपे आहे. र्क्तदाब मोजणे हे अक्षरशः दोन मिनिटांचे काम असते. आजकाल तर घरच्या घरी सुद्धा सध्या यंत्राच्या साहय्याने रक्तदाब मोजता येणे शक्य आहे. या विकाराची अगदी सुरवातीला फार काही लक्षणे दिसत नाहीत. पण जेवढ्या लवकर निदान होईल तेवढ्या चांगल्या प्रकारे उपाययोजना करता येत असल्याने वयाच्या पस्तीशी नंतर वर्ष-सहा महिन्यांनी एकदा तरी रक्तदाब मोजून घ्यावा. घरी रक्तदाबाची किंवा हॄदयरोगाची आनुवंशिकता असणार्‍यानी तर अधिकच दक्ष राहावे. वर सांगितलेली कारणे लागू होत असणार्‍यांनीही अधिक काळजी घ्यावी.


रक्तदाब वाढल्याची लक्षणे.

  • डोके दुखणे, चक्कर येणे, डोके जड वाटणे.
  • अशक्तपणा वाटणे, गळून गेल्यासारखे वाटणे.
  • अवेळी डोळ्यांवर झापड येणे पण योग्य वेळी झोप न येणे
  • छातीत धडधडणे
  • भरभर चालताना किंवा जिने चढताना दम लागणे
  • छातीत दुखणे
  • अकारण चिडचिड होणे

सुरवातीला ही लक्षणे सतत दिसत नाहीत,काही वेळाने अपोआप नाहीशी होतात. अशावेळेला लक्षणे दिसत असताना आवर्जून तपासणी करून घेतली तरच उच्च रक्तदाबाचे निदान होऊ शकते.

कैक वेळेला रक्तदाब वाढला तरी व्यक्तीला कहीही लक्षणे दिसत नाहीत. अशा परिस्थितीत बहुधा त्रास होत नाही म्हणून तपासणी केली जात नाही. या दोन्ही गोष्टी आरोग्याला घातक होत.

रक्तदाबाचा त्रास सुरू झाला की तो शेवट्पर्यंत राहणार, आयुष्यभर औषधे घ्यावी लागणार हे मात्र प्रत्येक केस मध्ये लागू होत नाही. वेळीच निदान होणे, मूळ कारण लक्षात घेऊन ते टाळायची तयारी असणे व रस-रक्ताच्या गती-विकॄतीवर योग्य उपचार सुरू करणे या गोष्टींनी रक्तदाब बराही होऊ शकतॉ. अर्थातच जितक्या लवकर, नियमित व योग्य उपचार केले जातील तितका लवकर व चांगल उपयोग होताना दिसतो.

रक्तदाब असणार्‍यांनी खालील गोष्टींवर लक्ष ठेवावे.

  • तळलेले तेलकट पदार्थ शक्यतो टाळावेत.
  • चीज, श्रीखंड, मांसाहार, अंडी, वाटाणा, पावटा, चवळी, हरबरा इत्यादी पचायला जड असणार्‍या वातवर्धक गोष्टी टाळाव्यात.
  • कच्चे मीठ किंवा वरून मीठ घ्यायची सवय सोडावी.
  • वजन प्रमाणापेक्षा अधिक वाढलेले असल्यास योग्य उपायांनी हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करावा.
  • रात्री उशिरा जेवायची सवय मोडावी.
  • रोज ३०-३५ मिनिटे चालायला जावे, योगासने करावीत. मात्र शरीराला थकवणारे व्यायामप्रकार टाळावेत.
  • रात्री लवकर झोपावे व प्रकॄतीनिरूप किमान ६ ते ७ तास शांत झोप लागेल याकडे लक्ष ठेवावे.
    दिवसभराच्या कामाचा ताण किंवा नातेसंबंधातीलतणावाचा स्वतःवर कमीतकमी परीणाम होईल यासाठी प्रयत्नरत राहावे, झोपण्यापूर्वी १० मिनिटे डोळे बंद करून शांत बसणे, आपल्याला आवडत्या छंदात मन गुंतवणे, मनःशांती देणारे स्वास्थ्यसंगीत ऐकणे, ध्यान करणे अशासारखा जमेल तो उपाय करावा.
  • काम करताना थकवा जाणवावयास सुरवात झाल्यास वेळीच विश्रांती घ्यावी. शरीर व मन दोहोंवर जबरदस्ती करू नये.
  • मुळात रक्तदाब वात-पित्त असंतुलनातून तयार होत असल्याने दूध, घरी बनवलेले साजूक तूप, साधा, सात्त्विक पण चौरस आहार ठेवावा. वजन वा कोलेस्तेरॉल वाढण्याच्या भीतीने हॄदय, मेंदूला पोषक व वात-पित्तशामक आहार पदार्थ अकारण बंद करू नयेत. मात्र चुकीच्या पद्धतीने बनवलेले तूप, बाजारातील लोणी वगैरे गोष्टी निश्चितच टाळाव्यात.
  • रक्ताभिसरण वाढवण्यासाठी, रसरक्तधातूंच्या गतीचे नियमन करण्यासाठी व शॠरातील रक्तवाहिन्यांतील काठीण्य नष्ट होण्यासाठी 'अभ्यंग' करणे हा एक श्रेष्ठ व सहज करता येण्यासारखा उपाय आहे. अभ्यंगासाठी वापरलेले तेल आयुर्वेदिक पद्धतीने शास्त्रशुद्धरीत्या तयार केलेले असावे. अशा शास्त्रशुद्ध अभ्यंगाची विशेषता अशी की याने कमी झालेला रक्तदाब पुन्हा पूर्ववत होऊ शकतो तसेच वाढलेला रक्तदाब कमी होऊ शकतो.
  • आयुर्वेदशास्त्राने सांगितलेले त्रिदोष संतुलन करणारे स्नेहन स्वेदनपूर्वक पंचकर्म शास्त्रशुद्ध पद्धतीने करून घ्यावे. विशेषतः वेरेचन, बस्ती या उपक्रमांचा रक्तदाबात उत्कॄष्ट फायदा होताना दिसतो. बरोबरीने मूळ कारणानुरूप शिरोधारा, शिरोबस्ती, कर्णपूरण, पिंडस्वेदन वगैरे उअपचार उत्तम फायदा करणारे आहेत.
  • शवासन, योगनिद्रा या योगातल्या क्रियांचा वाढलेला रक्तदाब कमी करण्यासाठी खुप उपयोग होतो. आत्मसंतुलन केंद्रात असंख्य रुग्णांनी अनुभव घेतल्यानंतर युनिव्हर्सिटी संलग्न संशोधनातून योगनिद्रा संगिताचा उपयोग सिद्ध झालेला आहे. तेव्हा अशा योगनिद्रा संगीताचाही रक्तदाब नियंत्रणासाठी उपयोग करता येईल.

रक्तदाब कमी करणार्‍या इतर औषधांच्या बरोबरीने मुळापसूनच रक्तदाब बरा करू शकणारी आयुर्वेदिक औषधेही सुरू करावीत म्हणजे हळूहळू त्रिदोषसंतुलन प्रस्थापित झाले, रसरक्तधातूतील गती-विकॄति नाहीशी झाली व बरोबरीने आहारविहारातील अनुशासन कायम ठेवले की रक्तदाबापासून मुक्ती मिळू शकते.

रक्तदाबाचे एक विशिष्ट असे औषध नसते तर प्रकॄती, वय, रक्तदाबाचा त्रास होण्याचे कारण वगैरे गोष्टींचा विचार करून योग्य औषध निवदावे लागते. किडनीचे काम व्यवस्थित होत नसल्यास गोमूत्र, पुनर्नवासव, गोक्षुरादी चूर्ण, चंद्रप्रभा वगैरे औषधांचा वापर करावा लागतो. हॄदयामुळे, रक्तवाहिन्यांमधील काठिण्यामुळे रक्तदाबाचा त्रास होत असल्यास बॄहत्वातचिंतामणी, सुवर्णभस्म, अर्जुनारिष्ट, सुवर्णसूतशेखर, वगैरे औषधे प्रकॄतीनिरूप योजावी लागतात. तर रक्तदाबाचे मूळ कारण मेंदूशी संबंधित असल्यास जटामांसी, ब्राह्मी, ब्राह्मीघॄत, वगैरे औषधांचा उत्तम उपयोग होताना दिसतो.

थोडक्यात सांगायचे झाले तर रक्तदाबाचा विकार मुळात होऊ नये यासाठी अगोदरच काळजी घ्यावी. पण तरीही रक्तदाब झालाच तर रक्तदाब नियंत्रित ठेवण्याबरोबरच मूळातून बरा होण्यासाठी योग्य उपचार करावेत. योग्य उपचारांना संतुलित आहार, निर्व्यसनी जीवन पद्धती, व्यायाम, चालणे, योग, संगीत व मानसिक स्वास्थ्य यांची जोड द्यावी.



- डॉ. श्री बालाजी तांबे

Thursday, August 6, 2009

ताब्यात ठेवा रक्तदाब


आहार हा आपल्या आदर्श वजनाच्या अनुषंगाने असावा. कमी खाणं, जास्त वेळा खाणं, शक्यतो पुर्ण शाकाहार आणि स्निग्ध पदार्थ टाळणं हे नियम तर माहितीचेच आहेत. ५ ग्रॅम मीठ म्हणजे छोट्या चमच्यामधे सपाट भरेल एवढच मीठ दिवसभरात खालं जावं. वरून घेतलेलं मीठ, लोणची, पापड, चटण्या, खारे पदार्थ सरासरीने वर्ज्य असावेत. कच्चे पदार्थ, मोड आलेली कडधान्य आहारामध्ये भरपुर असावीत.
आठवड्यातून ३ ते ४ तास एरोबिक पद्धतीचा व्यायाम हायपरटेन्शनच्या दॄष्टीने महत्त्वाचा असतो. जलद चालणं, धावणं, पोहणं, सायकलिंग किंवा हेल्थक्लब मधले एरोबिक्स हे सर्व एरोबिक व्यायामप्रकार आहेत. आठवड्यातून कमीत कमी ३ दिवस केलेल्या योगासनांमुळे शारीरिक आणि मानसिकदॄष्टयासुद्धा अनुकूल परीणाम हायपरटेन्शनवर दिसतात.
संपूर्ण व्यसनमुक्ती हा हायपर्तेन्शनच्या ट्रीटमेंटमध्ये अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तबाखू कुठल्याही स्वरूपात घेतली तरी त्यमुळे ब्लड प्रेशर हे वाढतच असतं आणि हायपरटेन्शनमुळे होणारा अ‍ॅथेरोस्क्लेरॉसिस नावाचा आजार की ज्यामुळे हॄदयविकाराचा झटका येतो किंवा पॅरालिसिस होतो हे कॉम्प्लिकेशन्सुद्ध आपण व्यसनमुक्तीमुळे टाळू शकतो.
प्रचंड धकधकीच्या जीवनामुळे अलीकडे तरुणांमध्येसुद्धा सर्रास हायपरटेन्शनचं प्रमाण वाढत चाललं आहे. तणावमुक्तीची उत्तरं हा एक फारच व्ययक्तिक प्रश्न असतो. रागाचा पारा खाली ठेवणं, व्यक्तिगत सबंध जाणीवपूर्वक सांभाळणं, स्वतःसाठी वेळ काढणं, छंद जोपासणं, आर्थिक व्यवहाराबद्दल स्वच्छ संकल्पना असणं, अतिमहत्वाकांक्षीपणाला थोडासा अंकुश ही ढोबळ तत्त्वं आहेत. हे सर्व साध्य होण्यासाठी योगासनं, ध्यानधारणा, आध्यात्मिक दॄष्टिकोन इत्यदी साधनांचा वापर व्हावा. तणाव हा परीस्थीतीत नसून मनःस्थितीत असतो. त्यामुळे आपल्या मनःस्थितीत बदल घडवण्याकडे लक्ष द्यावे. आध्यात्मिकतेची जोड तरुणपणीच लागल्यास अरेला कारे कमी होऊ शकतात. अशाप्रकारे उत्तम जीवनशैलीतल्या बदलाने आपण सिस्टऑलिक ब्लड प्रेशरचे २० आणि डायस्टॉलिकचे १० अंक सहज कमी करु शकतो.यामुळे बर्‍याच जणांची औषधं कमी होतात आणि क्वचित ती बंदसुध्दा होउ शकतात.
- डॉ. जगदीश हिरेमठ (हॄदयरोगतज्ज्ञ, पुणे)

Wednesday, August 5, 2009

आईचे दूध आणि बाळाची प्रतिकारक्षमता

बाळाला काही अपरिहार्य कारणामुळे अंगावर दूध मिळू शकले नाही, मात्र बालाची प्रतिकारक्षमता योग्य रहाण्यासाठी काय उपचार करावेत?
बाळाच्या एकंदर आरोग्यासाठी आईचे दूध हेच अप्रतिम होय व त्याला कुठलाच पर्याय नाही. तरीही प्रतिकाराक्षमता योग्य रहाण्यासाठी बा ळा ला रोज औषधी वनस्पतीन्नी सिद्ध केलेले व शरीराचे पोषण करून प्रतिकाराक्षमता वाढवण्यास सक्षम करणारे बला तेल, नारायण तेल यांसारखे तेल लावावे. आंघोळीनंतर धुप द्यावा. भिजवलेला बादाम, खारिक, जेष्ठमध, मुरुडशेंग, हिरडा, कायफ़ळ, अतिविष, नागरमोथा वगैरे गोष्टी उगाळुन तैयार केलेली गुटी नियमित चाटावयास द्यावी. मधामधे शुद्ध सोन्याचे ४-५ वळसे उगाळुन बाळाला चाटवावे. स्तनपानाअभावी बाळाला डब्याचे दूध चुकूनही देऊ नये तर गाईचे ताजे दूध द्यावे.

-डॉ. बालाजी तांबे

टिपणी : मला असे वाटते येथे डब्याचे दूध म्हणजे साधी दुधाची पुड म्हणायचे असेल डॉक्टरांना. कारण आजकाल जे फोर्मुला येतात बाजारात त्यात सागळि जीवनसत्वे असतात. गाईच्या दुधात लोह खुप कमी प्रमाणात असते. लोह बाळाच्या वाढीसाठी खुप महत्वाचे आहे. पण फार्मूला खुप महाग असतो. जर तो परवडत नसेल तर गाईचे दूधच उत्तम.
हे फक्त माझे मत आहे. इतरत्र वाचनावरुन मिळालेले ज्ञान. मी डॉक्टर नाही.

टवटवित गाल

वय १८ वर्षे असून गाल खोल गेलेले आहेत. ते टवटवित होण्यासाठी उपाय सुचवावा.

एकुणच शारीरिक शक्ती, प्रोटीन, लोह कमी होण्यानेहि असे होऊ शकते. प्रथम पचानाकडे लक्ष देऊन अन्न अंगी लागेल हे पहावे. धातुपोषक व शरिराशक्तिवर्धक अहारद्र्व्ये व औषधे यांच्या योग्य वापराने गालच नाहीतर संपूर्ण शरीरयष्टि सुधरता येणे शक्य आहे. रोज कपभर दूध चमचाभर खरिक पुड टाकून घ्यावे. दुधात शतावरी कल्प किंवा गोक्षुर, अश्वगंधादी चुर्णे टाकुन घेतल्यास अधिक उत्तम. रोज रात्री ५ बादाम पाण्यात भिजवावे व सकाळी साले काढुन टाकुन उगाळुन घ्यावेत. जेवणात घारी बनवलेले लोणी व साखर खावे. आहारात घरी बनवलेल्या तुपाचा सामावेश करावा. रोज नियमाने दंड-बैठका, योगासने व १२ सूर्यनमस्कार घालावेत. संतुलित व शरिरापोषक आहार घ्यावा.

- डॉ. बालाजी तांबे