Wednesday, October 24, 2012

वेगात जगा, अधिक जगा

          अन्नाचे पचन करुन त्याचे उर्जेत रुपांतर करण्याचा, म्हणाजेच चयापचनाचा, वेग अधिक असलेले उंदीर तिस टक्के अधिक काळ जगतात, असे इंग्लंड मधील एका प्रयोगात आढळून आले आहे. या दराने चयापचय वाढविणारी औषधे निर्माण केल्यास, माणासाची औमार्यादा २७ वर्षांनी वाधावातां येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. मुख्य म्हणजे चयापचयाचा वेग अधिक असलेले प्राणी कमी जगतात, असा आजवर समाज या शोधाने खोटा ठरविला आहे. म्हणजे 'live fast, die young' अशासारख्या म्हणींची जागा आता कदाचित 'वेगात जागा, अधिक जगा' ( live fast, live more) अशासारख्या घोषणा घेतील. या शोधामुळे वृद्धत्व टाळणारी औषधे चटकन उपलब्ध होतील, अशी आशा करणे मात्र चुकीचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
source- फॅमिली डॉक्टर  

Saturday, October 20, 2012

उपचार जुनाट सर्दीवर

          सायनुसायटिस हा सर्दीचाच एक प्रकार! चेहऱ्याच्या काही हाडांमधील पोकळ्या हवेने भरलेल्या असून, त्यांना सायनसेस (sinuses) असे म्हटले जाते. असे सायनसेस नाकाच्या प्रत्येक बाजूला चार असे असतात. नाकातील पटल हे सायनसच्या पोकळीत जाऊन पसरलेले असते.त्यामुळे नाकातील कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन, उदा. विषाणूंमुळे होणारी सर्दी (viral rihinitis) पसरत जाऊन आजूबाजूच्या सायनस पाटलाला देखील सूज येते. यालाच सायनुसायटिस असे म्हणतात.
          यात सर्दीचा स्त्राव सुरुवातीला पांढरट पाण्यासारखा असतो; परंतु जसजशी सर्दी वाढत जाते, तसा तो स्त्राव पिवळट, हिरवट बनत जातो., अशा प्रकारच्या सर्दीबरोबर डोके दुखणे , ताप किंवा बारीक कसर आल्यासारखे वाटणे, चेहरा, कपाळ नाकाचे हाड दुखणे, घशात मागच्या बाजूला चिवट स्त्राव होत रहाणे इत्यादी लक्षणे सायनुसायटिसमध्ये दिसून येतात.
           सततची सर्दी, दातांचे विकार, इन्फेक्शन यामुळे सायनुसायटिस होण्याची प्रवृत्ती वाढते. तसेच नाकाचे हाड वाढणे, नाकातील पॉलीप्स (वाढलेले माणसा) साचलेली घट्ट सर्दी या सर्व गोष्टी सायनुसायटिसची तीव्रता व गंभीरता वाढवायला कारणीभूत असतात.
            काही रुग्णांमध्ये प्रत्येक ऋतूत होणाऱ्या सर्दीमुळे नाकाच्या पाटलाला सूज येऊन ते जाड बनते. ही सूज घशात व नाकाशी निगडीत अशा युस्टेशिअन (Eustacian) नलिकेपर्यंत पसरत जाते. सूज आलेल्या या पाटलाची प्रतिकारक्षमता अत्यंत कमी असल्यामुळे रुग्णाची सतत सर्दी होण्याची प्रवृत्ती वाढते. हळूहळू नाक गच्च असल्यामुळे नाकाने श्वास घेणे बंद होऊन तोंडाने श्वास घेतला जाऊ लागतो. वास येण्याची व ऐकू येण्याची क्षमताही कमी होत जाते. सर्दी कायमची ठाण मांडून बसलेले हे रुग्ण इतर रोगांनाही सहजरीत्या आमंत्रित करतात.
           होमिओपॅथिक औषधे, नाकातून गळणारा स्त्राव बंद करतात. आतिल साचलेल्या स्त्रावाचा निचरा करतात, नाकाच्या व सायनसेसच्या श्लेष्माला पटलाची सूज व सूज येण्याची प्रवृत्ती कमी करतात. एवढेच नव्हे, तर नाकाच्या पाटलाला संरक्षणात्मक कवच देतात व रोग्यांची जंतूंचा संसर्ग होण्यापासून प्रतिकारक्षमता वाढवतात. होमिओपॅथितील हायड्रॅस्टीस, काली बायक्रोम, पल्सेटिला, मर्कसॉल, सिलीशीआ, थुना, हिपार सल्फ, काली आयोड  हि औषधे अत्यंत जुनाट सर्दीवर हि अश्चर्यकारकरीत्या मात करू शकतात. मात्र, सर्दीच्या प्रवृत्तीचे मूळ थोडे खोलवर रुजलेले असल्यामुळे त्या रुग्णाच्या प्रवृत्तीला सर्व बाजूंनी पुरक अशी होमिओपॅथिक  प्रकृतिजन्य (constitutional) औषधे तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावी लागतात.
            प्रत्येक पॅथीत शरीर निरोगी राखण्याची जशी शक्ती आहे, तशाच मर्यादाही! या शक्ती व मर्यादांचा खोलवर विचार करून त्या त्या वैद्यक शास्त्राचा उपयोग करून घेणे, हे मानवजातीसाठी हितावह ठरेल यात शंकाच नाही.
                                                                                                                       - डॉ. अपर्णा पित्रे

Friday, October 19, 2012

समज-गैरसमज गर्भधारणेबद्दलचे

           वाजतगाजत लग्न करून नववधू आली कि महिना - दोन महिन्यांतच तिला हळूहळू कानावर  येऊ लागतं, कि आता पेढे कधी देण्याचा विचार आहे?
           ज्या घरात ती मुलगी जन्मते , वाढते ते स्वत:चे घर सोडून ती नवीन घरात प्रवेश करते. तेथील माणसांशी, प्रत्यक्ष नवऱ्याशी जुळवून घेण्यासाठी तिला वेळ हवा असतो. तिथल्या पद्धती तिला समजून घ्यावयाच्या असतात . बऱ्याच वेळा तिचे शिक्षण पूर्ण झालेले नसते. नव्या पिढीनुसार तिचा जॉब, व्यवसाय लग्नानंतर बदललेला असतो. त्यामुळे त्यातच गर्भधारणेसारखी आयुष्यातील  अतिशय महत्वाची जबाबदारी तिच्यावर लगेच टाकू नये.
           घरात बऱ्याच वर्षात लहान मुल नाही. आजूबाजूच्या मुलांना मुलं झाली, आजी आजारी आहे. एकदा मुल झालं कि माहेरची माणसं सुटली, गर्भधारणा लांबणीवर टाकली की मुल होत नाही, असा गैरसमज. अनेक कारणांनी गर्भधारणा लवकर व्हावी म्हणून त्या मुलीवर दबाव आणला जातो.
           वैद्यकीय शास्त्रानुसार लग्नानंतर एक वर्ष गर्भधारणा होण्याची वाट बघावी. दोघांच्यात काही दोष नसला तरी एक वर्ष गर्भाधार्नेस लागू शकतो.
           गर्भ एकदि जाणीवपूर्वक रहायला हवा. नको असतांना अगदी लवकर गर्भ राहिला तर पहिला उद्गार असतो नको मला इतक्या लवकर. मग आयुष्यात जे बाळ आयुष्यभर साथ देणारे, आपला नावलौकिक पुढे उजळवणारे असते त्याचे असे नकारार्थी स्वागत करायचे का?
           बाजारातून एखादी वस्तू विकत घेताना आपण किती चोखंदळ असतो. सगळ्यात उत्तम दर्ज्याची, टिकाऊ वस्तू आपल्याला हवी असते. मग आपले मुल या जगात आणतांना काहीही विचार न करता आणावे का? ते मुल जगात आणणारी स्त्री शारीरिक व मानसिकदृष्ट्या सबळ करून मगच मुल होऊ देण्याचा विअचार आपण करायला हवा. मुलगी जेव्हा शारीरिक व मानसिकदृष्ट्या प्रगल्भ झालेली असेल तेव्हाच गर्भधारणा होऊ द्यावी.
           अलीकडच्या काळात स्त्री शिक्षणामुळे लग्न उशिरा होतात त्यामुळे एक वर्ग असा असतो की तो सर्व सेटल झाल्यावर मुलाचा विचार करतो. अति उशिरासुद्धा गर्भधारणा चांगली नसते. वाढत्या वयाबरोबर आईचे व मुलाचे सुद्धा प्रोब्लेम वाढतात. सर्वसाधारण पहिले मुल २५ वयाच्या दरम्यान व दुसरे ३० च्या पर्यंत तरी होऊन द्यावेत.
            गर्भधारणा करण्यापूर्वी मुलीने व मुलाने आपापले हिमोग्लोबिन, रक्तगट, एच.आय.व्ही., हिप्याटायटिस बी टेस्ट करून घेणे खूपच उपयुक्त ठरते. नवरा-बायकोचा रक्तगट एक असल्यास खूप जण घाबरतात. पण त्याचा गर्भधाराणेवर  काही परिणाम होत नाही. शक्यतो नात्यामध्ये लग्न करणे टाळावे. कारण काही अनुवंशिक दोष बाळात येण्याची शक्यता असते. मुलीने लग्नाआधी किंवा गर्भधारणेच्या आधी रुबेला ची लस टोचून घ्यावी.
             आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीनुसार अजूनही पहिले मुल हा मुलगाच व्हावा, अशी एक सर्वसाधारण धारणा पहावयाला मिळते. त्यामुळे गर्भधारणा समदिनी व्हावी, उजव्या किंवा डाव्या बाजुच्या बिजामुळे व्हावी अशा काही गैरसमजुती असतात. त्याला काही शास्त्रीय पुरावा नाही. चायनीस कॅलेंडर वगैरे बघणे, नाकात औषध घालणे, पोटात औषधे घेणे वगैरे सगळे अशास्त्रीय आहे. त्याला कोणी बळी पडू नये.
             गर्भधारणा होणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. त्यामुळे आपल्याला गर्भधारणा झाल्यावर खूप खर्च येईल किंवा आपले करियर सोडावे लागेल असे वाटते. पण नीट समजून गर्भधारणा केली तर तसे काहीच होत नाही.
            मासिक पाळी चुकल्यावर साधारण १० ते १५ दिवसांत डॉक्टरांना दाखून पुढील सल्ला घ्यावा. गोळ्या खाल्यावर मुल मोठे होते; मग सिझेरियन होते अशा गैरसमजुतीमुळे बरेच लोक काहीतरी गुंतागुंत होईपर्यंत डॉक्टरकडे येत नाहीत. तसे काहीच नसते. उलट काही औषधे उदा. फोलिक असिड, लोह, कॅल्शियम हे घटक बाळ व्यंग होण्यापासून वाचवतात व चांगले सुधृद बाळ होण्यास मदत करतात. म्हणून गर्भधाराणेकडे डोळस व शास्त्रीय नजरेतून बघितले तर बऱ्याच गुंतागुंतीतून मुक्त होऊन आपण एक सुधृद, चांगले मुल जन्माला घालू शकतो.
                                                                                                          --डॉ. सरोज शिंदे, कोल्हापूर